जीवन शैली मनोरंजन

सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे ‘ल क्लासे’ फॅशन शोचे ८ फेब्रुवारीला आयोजन

Share news

पुणे : सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे ‘ल क्लासे’ या फॅशन शोचे येत्या ८ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजन करण्यात आले आहे. फॅशन शोचे हे आठवे वर्ष असून, फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण डिझाईन्स आणि कलेला वाव देण्यासाठी या फॅशन शोचे आयोजन केले जाते, अशी माहिती सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रमुख आणि फ़ॅशन शोच्या समन्वयिका प्रा. रेणुका घोसपूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मोनिका कर्वे, याशी टिम्बडीया उपस्थित होते.
प्रा. रेणुका घोसपूरकर म्हणाल्या, “फॅशन शो म्हणजे तारांकित आणि झगमगाटाचे विश्व समजले जाते. यामध्ये सर्जनशील डिझाईनर्स, मॉडेल्स यांना आपली कला, ज्ञान सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. शिवाय, त्यांचा आत्मविश्वास दुणावतो. विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट डिझाईनर शोधण्यासाठी या ‘ल क्लासे’ फॅशन शोचा उपयोग होतो. व्यावसायिक स्वरुपाच्या फॅशन शोप्रमाणेच दरवर्षी महाविद्यालयाच्या वतीने या फॅशन शोचे आयोजन होते. सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कपड्यांच्या, दागिन्यांच्या डिझाईन्स परिधान करुन मुंबईतील अनेक मॉडेल्स त्याचे दर्शन घडवतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक होते. दरवर्षी एखाद्या संकल्पनेवर आधारित डिझाईन्स असतात. त्यासाठी विद्यार्थी संशोधन करुन अफलातून डिझाईन काम करतात. यंदा ‘न्यू स्टाईल इनोव्हेशन’ असे घोषवाक्य असून, भारतातील अनेक सेलिब्रिटी मॉडेल्स रॅम्पवर चालणार आहेत.”
“यंदा सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट फॅशन टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी नऊ विविध संकल्पना सादर करणार आहेत. हाताळणी, आभूषणे आणि सजावटीची तंत्र याचा यात समावेश असेल. आदिवासी, आफ्रिकन आणि बंजारा संस्कृतीवर भर दिला आहे. त्यासाठी डेनिम, कॅनकॅन फॅब्रिक, खुन फॅब्रिक अशा प्रकारांचा यात वापर केला आहे. विद्यार्थ्यांकडून मॉडेल्सना आभूषणे, कपडे परिधान केले जाणार आहेत. यातून डिझाईनर्सना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून काही स्वयंसेवी संस्थांतील गरजू आणि कल्पक विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे,” असे प्रा. घोसपुरकर यांनी नमूद केले.
अधिक माहितीसाठी प्रा. रेणुका घोसपूरकर (8956943824), भारती खर्शीकर (9112297601), मोनिका कर्वे (8378998124) व नूतन जाधव (8956932415) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.—————————–पत्रकार परिषदेत माहिती प्रा. रेणुका घोसपुरकर. प्रसंगी डावीकडून तर्जनी पटेल, याशी टिम्बडीया, प्रा. घोसपुरकर, मोनिका कर्वे, धनाली सुर्वे 

Leave a Reply