होम

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांचे निधन ..

Share news

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांचे निधन झालं. मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटल (नेपेन्सी रोड) इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 70 वर्षांचे होते. हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी यासारख्या दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिका, तसंच माहेरची साडी, अष्टविनायक यासारख्या लोकप्रिय सिनेमात त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. मराठीतील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. जून 2018 मध्ये मराठी नाट्य संमेलनात अभिनेते रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.