जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांची अचानक एक्झीट…. धक्कादायक.. सामाजिक भान असलेला पोलिस वर्दीतला सिंघम काळाच्या पडदयाआड

Share news

.
पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांचे नाशिकच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये मृत्यूंशी झंुज देत असतांना अखेर निधन झाले. गिरीष पाटील हे आधी शहादा तालुक्यात पोलिस निरीक्षक म्हणून रूजू झाले होते. प्रचंड वाचनाचा व्यासंग असलेल्या या माणसाला माणूस जोडण्याचा छंद होता. माणसं जोडत असतांना अमळनेर तालुक्यातील मारवड या गावाच्या विकासासाठी ते सतत झटत होते. रूबाबदार राजबिंडा या व्यक्तीमत्वाने अनेकांच्या मनात घर करून ठेवले होते. गत महिन्यात त्यांनी स्वत:च्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून कायदयाच्या चौकटीत राहून एका वरीष्ठ अधिका-याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून घेतला. ही केस त्यांना महाग पडेल ,असे त्यांच्या गावीही नव्हते.त्यानंतर त्यांच्या विरोधात मोर्चे निघाले. अशातच त्यांची बदली कंट्रोलरूमला करण्यात आली. पुढे नियमानुसार त्यांची नाशिक ग्रामीण या विभागात बदली झाली. मानसिक खच्चीकरण झालेल्या पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांची प्रकृती दरम्यानच्या काळात प्रचंड ख्रराब झाली होती.त्यांचे मोबाईल स्विच ऑफ येत होते. बदली होण्यापूर्वी त्यांना शहादा येथील अवंतिका फौंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाला होता.परंतू प्रकृती खराब असल्याने ते पुरस्कार घेण्यास येऊ शकले नव्हते.त्यांच्या असिस्टंटने मला भ्रमणध्वनीने निरोप दिला होता. साहेबांची प्रकृती खराब आहे,ते पुरस्कार घेण्यास येऊ शकणार नाहीत. तत्पूवी अवंतिका फाऊंडेशनने मला,विजय पवार व गिरीश पाटील यांना पुरस्कार घोषित झाल्याचे पत्र सुपुर्द केले होते. त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा भेट झाली. एकदा फोनवर बोलणे झाले.त्यानंतर सकाळी त्यंाना भावपुर्ण श्रध्दांजली वाहणारे पोस्ट येऊ लागले.


सामाजिक भान असलेला पोलिस वर्दीतला सिंघम काळाच्या पडदयाआड गेल्याने दुख होत आहे.माणसे पन्नाशीच्या आत देवअाज्ञा झाल्यावर प्रचंड वेदना होतात. हे दु:ख मित्र म्हणून पचवू शकत नाहीत.अशा वेळेस त्यांच्या परिवाराची काय स्थिती असेल? हे शब्दांच्यापलिकडचे आहे.
गावकडल्या माणसांवर माणूसकी ठेवून प्रेम करणा-या सामाजिक संघटना,पत्रकारांशी समन्वय साधून सुवर्ण मध्य काढणा-या पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांना जीवदान देण्यासाठी कुणीही मध्यस्थ का झाले नाही? याचे वाईट वाटते. पाटील साहेबांचे कार्य नंदुरबारकर तसेच मारवडकर कधीच विसरू शकणार नाहीत.त्यांना अश्रूपुर्ण भावपुर्ण श्रध्दांजली.परमेश्वर त्यांच्या कुटुंबिंयाना दु:ख पचविण्याची शक्ती देओ.हीच इश्वर चरण प्रार्थना.