International Conference on 'Shashvat Vikas' by the MES Garware College of Commerce
जीवन शैली ठळक बातम्या

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे ‘शाश्वत विकासा’वर आंतरराष्ट्रीय परिषद

Share news

पुणे, 18 जानेवारी 2019 : “अमेरिकेसारखी प्रगत जीवनशैली या पृथ्वीतलावर जर सर्वांनाच हवी असेल, तर एकच पृथ्वी पुरेशी नाही, या पृथ्वीसारख्या आणखी ०४ पृथ्वींची आवश्यकता आहे.” या शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सतीशकुलकर्णी यांनी ‘शाश्वत विकास’ या विषयासंबंधीच्या समस्येचे गांभीर्य स्पष्ट केले. यानंतर एअरमार्शल श्री. भूषणजी गोखले (निवृत्त) म्हणाले, “शाश्वत विकास हा मुद्दा हा आजच्या घडीला परराष्ट्रीय संबंध घडण्या-बिघडण्याला देखील कारणीभूत ठरत आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्याजागरुकतेसंबंधीची जागरुकता निर्माण करून या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने ‘मएसोगरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स’ने एक पाऊल पुढे टाकले आहे” असे म्हणता येईल.

‘शाश्वत विकास’ या मुख्य संकल्पनेवर आधारित ही आंतरराष्ट्रीय परिषद ‘मएसोगरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स’नेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ; जेम्स कुक युनिव्हर्सिटी, सिंगापूर;युनिव्हर्सिटी ऑफ हल, लंडन यांच्या संयुक्त विद्यमानेदिनांक १७ व १८ जानेवारी २०१९ या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित केली आहे. या परिषदेला FCCI, श्रीलंका व SAARC यांचा ज्ञान-सहयोग (Knowledgepartner) लाभला आहे. परिषदेचा उद्घाटन समारंभ आज सकाळी विविध दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी व्यासपीठावर परिषद समन्वयक व प्राध्यापिका डॉ. रोहिणी गोटे, प्राचार्य डॉ. आनंद लेले,सिए अभय क्षीरसागर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. यशवंत वाघमारे,जेम्स कुक युनिव्हर्सिटीचेइंटिरीमडेप्युटीव्हाईसचॅन्सलर डॉ. अभिषेक भाटी,मएसोचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त),सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी,युनिव्हर्सिटी ऑफ हल, लंडन येथील इंटरनॅशनल रिलेशन्सऑफिसरलेनबॅरो, मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सतीशकुलकर्णी, व मएसोचे सचिव डॉ. भरत व्हनकटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच FCCI श्रीलंका येथील सेक्रेटरी जनरल अजित परेरा, ‘SAARC इंडिया’चेव्हाईसप्रेसिडंटविनोद जुनेजा, डॉ. अशोक मोडक, आनंद जोशी, डॉ. विनायक गोविलकर, बिपीन देवकर, अभय टिळक,डॉ. सतीश देवधर,डॉ. निर्मला जोसेफ यांचे मार्गदर्शन या परिषदेला लाभले होते. भारताबरोबरच नेपाळ, श्रीलंका अशा विविध देशांमधून संशोधकांचा सहभाग या परिषदेत होता.

Leave a Reply