ठळक बातम्या पुणे होम

उद्योगश्री जीवनगौरव पुरस्काराने रोहिदास पाटील सन्मानित

Share news

मुंबई/ भाईंदर. ( प्रतिनिधी ) – प्रविण रब्बर कंपनीचे संचालक व श्री शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष तथा मिरा भाईंदर मनपा सभागृह नेता रोहिदास पाटील यांना उद्योगश्री प्रकाशनाद्वारा सन 2018 सालाचा उद्योगश्री जीवनगौरव पुरस्कार मुंबई मराठी पत्रकार संघ येथे उद्योगाद् राष्ट्र वैभवम् 25 वर्षे सन्मानाची, उद्योगश्री प्रकाशनाची 36 वर्षे या कार्यक्रमात प्रदान करून गौरविण्यात आले आहे.

यावेळी उद्योगश्री प्रकाशनाचे संपादक भीमाशंकर कठारे म्हणाले की, आमच्या मजकुरातून  मराठी माणसाला उद्योग समजावून त्याची जडण घडण व्हावी, मराठी उद्योजक तयार व्हावे, मी उद्योजक होणार असे म्हणणारी तरुणपिढी तयार व्हावी. याच उद्देशाने आम्ही उद्योगश्री हा पुरस्कार प्रदान करत असतो. उद्योजकच भारताला महासत्ता देश बनवू शकतात. तसेच टीम असेल तरच उद्योजक मोठा होऊ शकतो असे या कार्यक्रमात सर्वांनी अधोरेखित केले. दरम्यान प्रविण रब्बर कंपनीचे संचालक रोहिदास पाटील म्हणाले की, मी उद्योजक होण्याच्या मागे माझे संपूर्ण कुटुंब आहे. सव्वा रुपया रोजगाराने अशा परिस्थिती मी नोकरी केली. सन 1969 मध्ये प्रविण रब्बर कंपनीत मीच कामगार, मीच मालक, मीच सेल्समन अशा पद्धतीत सुरु झालेल्या कंपनीचा माल आज देशातील मोठ्या उद्योग समूहामध्ये जात आहे. भाईंदर मधील मोठ्या दुर्घटनेनंतर सन 1994 मध्ये 21 विद्यार्थ्यांवर सुरु झालेले महाविद्यालय आज 8500 विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेत आहेत. दरम्यान पाटील यांनी राम कापसे, राम नाईक यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

प्रमुख पाहुणे सारस्वत बँक अध्यक्ष गौतम ठाकूर, सन्माननीय पाहुणे बाष्प इंडस्ट्रीज ठाणे बापू पाटील, कार्यक्रम अध्यक्ष कॅम्लिन – कोकियो लि. मुंबई मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर, केसरी टूर चे संचालक केसरी पाटील, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, नरेश राऊत, या सोहळ्याचे यजमान राजेश सोळंकी, हर्षल वालावलकर यांच्या उपस्थित झाला. यात नामवंत उद्योग समूहातील संचालकांना उद्योगश्री पुरस्काराने सन्मानित करण्यता आले. त्यात उद्योगश्री जीवनगौरव पुरस्कार रोहिदास पाटील यांना देण्यात आला. उद्योगश्री प्रकाशन द्वारा आयोजित आणि मिराज इन्स्टुमेटेशन सर्विसेस (इं.) प्रा. लि. ठाणे, व एच. आर. कॉर्पोरेशन मुंबई आयोजित द्वारा प्रायोजित रौप्यमहोत्सवी उद्योगश्री गौरव सन्मान सोहळा झाला.