India's historic series victory over Kangaroo's land.
क्रिडा

भारताचा कांगारुच्या भुमीवर ऐतिहासिक मालिका विजय

Share news

पुणे, 19 जानेवारी 2019 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखुन पराभव करीत मालिका जिंकली. तत्पुर्वी भारतीय संघ नायक विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाज़ी करण्याचा निर्णय घेतला आणि हा विराट कोहलीचा निर्णय भारतीय गोलंदाज़ांनी सार्थ ठरवत कांगारुना सळो की पळो करुन सोडले.

भारताकडुन गोलंदाजीत फिरकीपटु यजुवेंद्र चहलने घातक गोलदांजी करत कांगारुचे ६ बळी मिळवले तर शमी व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी २ बळी मिळवत कांगारुचा डाव २३० धावात संपुष्टात आणला.तर भारताकडुन फलंदाजीसाठी उतरलेल्या रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीला आज विशेष प्रभाव टाकता आला नाही.

संघ नायक विराट कोहलीने ४६ तर महेंद्रसिंग धोनी नाबाद ८७ आणि केदार जाधवने नाबाद ६१ धावा केल्या.

ऑस्ट्रेलिया – २३०(४८.४)
भारत – २३४ /३ (४५. २)

आता बातमी, माहिती, मनोरंजन, दिनविशेष, तंत्रज्ञान, खेळ आणि नोकरी विषयक माहिती तुमच्या व्हाट्सअँप वर अगदी विनामूल्य मिळवा.

https://goo.gl/UFZBzk

Leave a Reply