ठळक बातम्या तंत्रज्ञान पुणे होम

PAN कार्डच्या नियमांमध्ये 1 एप्रिलपासून मोठे बदल होणार ……

Share news

नवी दिल्ली- आपण पॅन कार्ड बनवण्याचा निर्णय घेतला आहे, तर मग काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण प्राप्तिकर विभागानं पॅन कार्डाच्या नियमांत तीन मोठे बदल केले आहेत. प्राप्तिकर विभागानुसार, पॅन कार्डसाठी अर्ज करत असताना घटस्फोटित आई-वडील असल्यास वडिलांचं नाव देणं आता बंधनकारक असणार नाही. प्राप्तिकर विभागानं एका अधिसूचनेद्वारे प्राप्तिकराच्या नियमांत संशोधन केलं आहे.

जाणून घ्या 1 एप्रिल 2019पासून काय होणार बदल?
आधारला पॅन न जोडल्यास होणार निष्क्रिय-पॅन कार्ड आधार कार्डला अद्यापही लिंक केलेलं नसल्यास आपल्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

आधारला पॅन लिंक न केल्यास आयटी कलम 139 एएअंतर्गत ते निष्क्रिय समजलं जाईल. प्रत्यक्ष कर संचालक मंडळांनी आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मर्यादा वाढवून 31 मार्च 2019पर्यंत केली आहे. आयटी विभागानुसार, आर्थिक वर्षात 2.5 लाखांहून अधिकची पैशांची उलाढाल असल्यास पॅन कार्ड काढणं गरजेचं आहे. असे लोक 31 मेपर्यंत पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात. 

नव्या स्वरूपात पॅन कार्ड- नव्या पॅन कार्डवर अर्जदाराचं नाव, त्याच्या आई-वडिलांचं नाव, जन्मतारीख आणि पॅन नंबरशिवाय QR कोडही असणार आहे. QR कोडमध्ये अर्जदाराचा फोटो आणि स्वाक्षरीबरोबरच इतर माहितीही पॅन कार्डवर उपलब्ध असणार आहे. ही माहिती डिजिटल साइंड आणि कोडेड असणार आहे. तसेच पॅन कार्ड स्कॅनिंग करूनही माहिती उपलब्ध करून घेता येणार आहे. नव्या पॅन कार्डवर फोटो, स्वाक्षरी, होलोग्राम आणि QR कोडची जागा बदलण्यात आली आहे. QR कोड हा आता e-PANमध्येही मिळणार आहे.

QR कोड कसा होणार स्कॅन- QR कोड विशेष मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून स्कॅन करता येणार आहे. तसेच गुगल प्ले स्टोअरवरही ते मोबाइल अप उपलब्ध आहे(Keywords- Enhanced PAN QR Code Reader). परंतु QR कोड स्कॅन करण्यासाठी 12 मेगापिक्सल किंवा त्याहून अधिक चांगल्या क्लिअ‍ॅरिटीच्या कॅमेऱ्याची गरज आहे.

जुनं पॅन कार्डही राहणार सक्रिय- नव्या डिझाइनमधले पॅन कार्ड आल्यानंतर 7 जुलै 2018पूर्वी जारी करण्यात आलेले पॅन कार्डही कार्यरत राहणार आहेत.