In National Taykvando Compitition to Sanvi Kshetri Gold in 'Pumse', Silver in 'Kirogi'
क्रिडा ठळक बातम्या पुणे

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सान्वी क्षेत्रीला ‘पुमसे’त सुवर्ण, तर ‘किरोगी’त रौप्य पदक

Share news

पुणे, 29 जानेवारी 2019 : मुंढवा-केशवनगर येथील सान्वी क्षेत्री हिने राजाराम भिकु पठारे स्टेडीयमवर झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘पुमसे’ क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, तर किरोगी (फाईट) या क्रिडा प्रकारात रौप्य पदक मिळवत यशस्वी कामगिरी केली. होरांगी तायक्वांदो अकॅडमीतर्फे नुकतेच या स्पर्धेचे आयोजन केले होते. सान्वी क्षेत्री वयाच्या ५ वर्षापासुन मेहनत करीत आहे. सान्वी विद्या प्रतिष्ठानच्या सीबीएसई  इंग्लिश शालेत इयत्ता पहिलीत शिकत आहे. सान्वीने प्रांजल पानसे व अन्वी बांगर यांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावले.


या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, आसाम, गुवाहाटी, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली येथून स्पर्धक सहभागी झाले होते. देशांतर्गत एकूण १५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि तीनवेळा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर असलेले सिद्धू क्षेत्री हे सान्वीचे वडील असून, त्यांच्याकडून ती या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे.

आता बातमी, माहिती, मनोरंजन, दिनविशेष, तंत्रज्ञान, खेळ आणि नोकरी विषयक माहिती तुमच्या व्हाट्सअँप वर अगदी विनामूल्य मिळवा.

https://goo.gl/UFZBzk

Leave a Reply