In India, WhatsApp is the highest among Facebook users
तंत्रज्ञान

भारतात फेसबुकपेक्षा व्हॉट्सॲप युजर्स सर्वाधिक

Share news

बीएसएनएलने ‘डेटा सुनामी’ प्लान जाहीर केला आहे. ९८ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये बीएसएनएल अवघ्या १.१ रुपयात एक जीबी डेटा दररोज देणार आहे. या प्लानची वैधता २६ दिवस असणार आहे. 

रिलायन्स जिओ आणि अन्य खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएल प्रयत्न करत आहे. बीएसएनएलने जाहीर केलेल्या ९८ रुपयांच्या प्लानमध्ये फक्त डेटा मिळणार आहे. बीएसएनएलने २९९ रुपयांचा ब्रॉड ब्रॅण्ड प्लान जाहीर केला असून यामध्ये १.५ जीबी डेटा दररोज मिळणार असून ३० दिवसाची वैधता असणार आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा असणार आहे. तर, ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज ३.२१ जीबी डेटा मिळणार आहे. 

बीएसएनएलने भारत फायबर ब्रॉडब्रॅण्ड सेवा सुरू केली. बीएसएनएल आपल्या या सेवेद्वारे जिओ रिलायन्स आणि भारती एअरटेलला आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 
जिओ रिलायन्स १४०० शहरांमध्ये जीगाफायबरची चाचणी करत असतानाच बीएसएनएलने नवीन प्लान जाहीर केला आहे. 

बीएसएनएल सीएफएचे संचालक विवेक बंसल यांनी सांगितले की, सध्या लोकांकडून अतिजलद इंटरनेटची मागणी करत आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्याच्या काळात अधिक इलेक्ट्रोनिक्स उत्पादने आहेत. भारत फायबर इंटरनेट सर्वांना परवडणारी असून ग्राहकांच्या मागणीला पूर्ण करू शकणार आहे. बीएसएनएलच्या ‘भारत फायबर नेट’ची बुकींग ऑनलाइन करता येणार आहे.


……………………………………………………………………………………………..मटाच्या सौजन्याने

आता बातमी, माहिती, मनोरंजन, दिनविशेष, तंत्रज्ञान, खेळ आणि नोकरी विषयक माहिती तुमच्या व्हाट्सअँप वर अगदी विनामूल्य मिळवा.

https://goo.gl/UFZBzk

Leave a Reply