कराड होम

प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांना “जाणता राजा छत्रपती शिवराय सांप्रदायिक सद्भावना पुरस्कार” जाहीर

Share news

लोणी काळभोर- (प्रतिनिधी) प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांच्या या कार्याची नोंद घेऊन लोणी-काळभोर, पुणे येथील हजरत बागुलशहावली रहे. ट्रस्ट यांच्या वतीने व पंचक्रोशीतील मुस्लीम बांधवांच्या वतीने शुक्रवार, दि. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी २=०० वाजता लोणी काळभोर, येथील आलमगिर मशिदीमध्ये डॉ. विश्‍वनाथ कराड यांना “जाणता राजा छत्रपती शिवराय सांप्रदायिक सद्भावना पुरस्कार” देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे.
          विश्‍वशांती केंद्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी विश्‍वशांती केंद्राच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी अनेक उपक्रम राबविले. रामेश्‍वर (रुई), ता. जि. लातूर येथे त्यांनी बांधलेला हजरत जैनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा, श्रीराम-रहीम मानवता सेतु, सुफी-वारकरी परिषद, ह. गरीब नवाझ यांचा साजरा केलेला ८०० वा उर्स व रमजानच्या पवित्र महिन्यात ७ दिवस आयोजित केलेला “दर्स-ए-कुरान” इ. उपक्रमातून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा अतिशय सकारात्मक असा संदेश संपूर्ण देशात गेलेला आहे.        या कार्यक्रमात लोणी काळभोर येथील हिंदु-मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रियाज शेख, वाहिद शेख, शब्बीर पठाण व शकूर शेख यांनी केले आहे.