Good response to 'Art Walk' of 'School of Art'
क्रिडा ठळक बातम्या पुणे

‘स्कुल ऑफ आर्ट ‘ च्या ‘आर्ट वॉक ‘ला चांगला प्रतिसाद

Share news

पुणे, 29 जानेवारी 2019 :

‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी ‘आयोजित आर्ट वॉक आणि आर्ट एक्झिबिशन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. २६ आणि २७ जानेवारी रोजी हे प्रदर्शन आझम कॅम्पस (पुणे कॅम्प) येथे भरले होते. 

स्कुल ऑफ आर्ट अँड आर्ट अकेडमी च्या अकराव्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन  निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते आणि निवृत्त मेजर जनरल श्री. पवार यांच्या उपस्थितीत झाले . युवा कलाकार गणेश कळसकर यांनी पोर्ट्रेट निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध  कलाकृती मांडल्या होत्या. स्कुल ऑफ आर्टच्या संचालक हेमा जैन, स्कुल ऑफ आर्ट प्राचार्य भरत लोंढे यांनी संयोजन केले . 

संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार, संस्थेचे सचिव लतिफ मगदूम आदी मान्यवर  उपस्थित होते . 

आता बातमी, माहिती, मनोरंजन, दिनविशेष, तंत्रज्ञान, खेळ आणि नोकरी विषयक माहिती तुमच्या व्हाट्सअँप वर अगदी विनामूल्य मिळवा.

https://goo.gl/UFZBzk

Leave a Reply