ठळक बातम्या पाककला होम

लोणी काळभोर येथे बाजारासाठी पत्राशेडचे आ.बाबूराव पाचर्णे यांचे हस्ते उद् घाटन

Share news

लोणी काळभोर – प्रतिनिधी – (चंद्रकांत दुंडे.) येथील आठवडे बाजार भरणाऱ्या व्यापारी, शेतकरी व ग्राहकांना ऊन, पाऊस यापासून संरक्षण मिळावे आणि शेतीचा माल खराब होऊ नये यासाठी लोणी काळभोर ग्रामपंचायतिच्या माध्यमातून ग्रामनिधी व नागरी सुविधा निधी मधून शेड बांधण्यासाठी अंदाजे ३०,००,००० लाख रुपये चे कामाचे भूमिपूजन आमदार बाबुराव पाचर्णे याच्या हस्ते करण्यात आले.
       कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत काळभोर (अध्यक्ष-ह.ता.ख.वि.संघ), उपस्थित सरपंच अश्विनी गायकवाड, मा.सरपंच वंदना काळभोर, ग्रा.पं. सदस्य राजाराम वि. काळभोर, राजाराम य. काळभोर, विजय ज्ञा. ननवरे, आण्णासो ग. काळभोर, पांडुरंग बा.केसकर, बाळासो ज. काळभोर, ग्रा.पं. सदस्या रेखा काळभोर, साविता लांडगे, मंगल बनकर, सिमा काळभोर, विठ्ठल काळभोर, तटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष व ग्रामविकास अधिकारी के. एल. थोरात व इतर मान्यवर उपस्थित होते.
           शेतकरी, व्यापारी व ग्राहकवर्गातून समाधान व्यक्‍त होत आहे. लोणी काळभोर परिसरातील सर्वात मोठा आठवडी बाजार भरतो. या बाजारामध्ये सकाळी व सायंकाळी शेतकरी शेतातील भाजीपाला व अन्य माल विक्रीसाठी आणतात. दिवसेंदिवस वाढत्या नागरिकीरणामुळे ग्राहकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. दररोजचा भाजीपाला व माल विक्रेत्यांना सध्यस्थितीत शेड उभारून देण्यात आले आहे. मात्र पावसाळ्यात व्यापारी व शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान होते. व्यापारी, शेतकरी यांचा माल खराब होऊ नये आणि ग्राहकांना पावसाळ्यात व उन्हाळ्यात गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामनिधी व नागरी सुविधा निधी मधून शेडसाठी ३०,००,००० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गामधून समाधान व्यक्‍त केले जात आहे. मात्र, रात्री दहा वाजेपर्यंत ग्राहकांची वर्दळ चालूच असते. बाजारतळमध्ये लाईट, पाणी व शौचालयाची पण व्यवस्था करण्यात आली आहे.