Film producer Sadanand alias Pappu Lad commits suicide
मनोरंजन लाईव्ह अपडेट्स

चित्रपट निर्माते सदानंद ऊर्फ पप्पू लाड यांची आत्महत्या

Share news


मुंबई, ता. 17 जानेवारी 2019 : चित्रपट निर्माते सदानंद ऊर्फ पप्पू लाड (51)यांनी लाडाचा गणपती मंदिरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती व त्यात एका विकासकाला जबाबदार धरल्याचे सूत्रांकडून समजते.
याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.ग्रॅण्ट रोडच्या मौलाना शौकत अली मार्गावर लाडाचा गणपतीचे मंदिर आहे. सकाळी नऊ वाजता मंदिराचा दरवाजा उघडला असता पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अँगलला नायलॉनच्या रस्सीने गळफास लावलेल्या अवस्थेत सदानंद लाड आढळून आले. त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले; पण रुग्णालयात नेण्यापूर्वीच लाड यांचा मृत्यू झाला होता. लाड हे गायवाडीतील राजेंद्र मॅन्शनमध्ये राहत होते. त्यांनीच लाडाचा गणपती मंदिराची उभारणी केली होती. त्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. लाड हे चित्रपट निर्माते म्हणूनदेखील प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. पप्पू लाड यांनी आत्महत्येपूवी सुसाईड नोट लिहिली असूनत्यात बिल्डर सिद्धार्थ ग्रुप आणि ताहीर भाई यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आत्महत्या करत आहे, असे म्हटले होते. पप्पू लाड यांचा मुलगा अंकुर याने बिल्डर आणि ताहीर भाई यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave a Reply