जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

गतिमंद मुलीचा चटके देत मारहाण करत शारीरिक छळ

Share news

येलवाडी येथील वात्सल्य शिक्षण संस्थेतील प्रकार,.शिक्षक शिक्षिकासह चार जणांवर गुन्हा दाखल,.

.चाकण, : शिक्षण आणि संगोपनासाठी शाळेत ठेवलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीला चटके देत जबर मारहाण करत झोपेचे औषध देवून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी येलवाडी ( ता. खेड ) येथील वात्सल्य शिक्षण संस्थेच्या शिक्षक, शिक्षिका, शाळेतील केअर टेकर पती पत्नी अशा एकुण चार जणांवर चाकण पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी ( दि. ४ मार्च ) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. येलवाडी ( ता. खेड ) येथील वात्सल्य शिक्षण संस्थेत सबंधित प्रकार जून २०१८ ते ११ फेब्रुवारी, २०१९ या कालावधीत घडला होता.       वि

विलास देवतरासे या शिक्षकासह शिक्षिका वैशाली देवतरासे, शाळेतील केअरटेकर पती पत्नी ( नाव, गाव, पूर्ण पत्ता समजला नाही.) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. चिंचवड येथील ३८ वर्षीय महिलेने याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, येलवाडी ( ता. खेड ) येथे गतिमंद मुला – मुलींसाठी वात्सल्य शिक्षण संस्थेकडून शाळा चालविली जात आहे. या शाळेत सबंधित महिलेने तिची १६ वर्षे वयाची गतिमंद अल्पवयीन मुलगी शिक्षण आणि संगोपनासाठी ठेवली होती. ती मुलगी फक्त या शाळेत नऊ महिने राहिली. शाळेचे शिक्षक विलास देवतरसे, शिक्षिका वैशाली देवतरसे तसेच केअरटेकर पती पत्नी असे चार जण तिला संगनमताने रात्री अपरात्री चटके देत असत. तसेच तीच्या डोक्यात, हाता पायावर, कपाळावर जबर मारहाण करत होते. तसेच पिडीत मुलीच्या जेवणातून आणि पाण्यातून झोपेचे औषध देवून तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.      रोजच्या होत असलेल्या या छळाला वैतागून पिडीतेच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून येथील पोलिसांनी याप्रकरणी वरील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या विचित्र प्रकाराने खेड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली आहे.