जीवन शैली पुणे होम

चाकण येथे भाजपाने केला कमल ज्योती अभियान साजरा,.

Share news

चाकण,    ( वार्ताहर ) – भारतीय वायुसेनेने अतिरेक्यांवर तडाखेबंद हल्ला करून जवळपास साडे तीनशे अतिरेक्यांचा खात्मा केला. दहशत वाद्यांविरोधात त्यांनी केलेल्या शौर्याचे चाकण येथे भारतीय जनता पार्टीच्या येथील पदाधिका-यांनी फटाके फोडून साखर व पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.     भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजनभाई परदेशी यांच्या हस्ते चाकण येथील माणिक चौकात भारत मातेचे पूजन करून भारत मातेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कमल ज्योती अभियान दीपप्रज्वलन करून साजरे करण्यात आले. जयहिंद, वंदे मातरम, भारत माता की जय, फिर एक बार मोदी सरकार, आदि जोरदार घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी चाकण शहर दणाणून सोडले. यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड. सचिन सदावर्ते, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग ठाकूर, उद्योग आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजनभाई परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, अमृत शेवकरी, सतीश धाडगे, प्रवीण कर्पे, अजय जगनाडे, अमोघ धाडगे, पराग बारमुख, संदेश जाधव, ॲड.प्रितम शिंदे, शाम पुसदकर, प्रतिक गंभीर, मयुर जाधव, किरण टिळेकर, बाळासाहेब नाणेकर, श्रीकृष्ण इंगळे, दत्तात्रय परदेशी, संतोष हजारे, लहू लांडे, अर्जुन बो-हाडे, किशोर अहिरे, शरद दोंद, निलेश गोतारणे, रत्नमाला भुजबळ, रूपाली परदेशी,  सारिका इंगळे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.     राजन परदेशी यावेळी म्हणाले,” पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानचा चकोटे, बालाकोट, मुझफराबाद आदि ठिकाणी हवाई हल्ले करून भारतीय सेना पाकिस्तान मध्ये घुसली. जैशच्या अतिरेक्यांच्या तळावर मोठे हवाई हल्ले करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारताने सर्वात मोठा सर्जिकल सट्राईक केला, ही सर्वांच्या दृष्टीने कौतुकास्पद बाब असून, याचा सर्वानी आदर्श घेतला पाहिजे.” यावेळी वरील मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले.           वृषाली जगनाडे व रत्नमाला भुजबळ यांनी स्वागत केले. पराग बारमुख यांनी प्रास्ताविक केले. संदेश जाधव यांनी सूत्रसंचालन, तर अजय जगनाडे यांनी सर्वांचे आभार मानले