आरोग्य

आयुर्वेदात दुर्धर आजारांना बरे करण्याची क्षमता मुक्ता टिळक यांचे प्रतिपादन; ‘आयुर्ब्लीस’ आयुर्वेद व पंचकर्म केंद्राचे उद्घाटन

Share news

पुणे : “आयुर्वेद ही भारताची पाच हजार वर्षांची आरोग्य परंपरा आहे. अनेक दुर्धर आजारांना बरे करण्याची आणि आजार होऊच नयेत, याची क्षमता असलेले हे आरोग्यशास्त्र आहे. आयुर्वेद ही शाश्वत अशी शास्त्रोक्त उपचारपद्धती असून, भारतीयांनी आयुर्वेदाला प्रोत्साहन दिले पाहिजे,” असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
ऍलोपॅथिक डॉक्टर असलेल्या गौरी अभ्यंकर-कर्वे यांच्या संकल्पनेतून एरंडवणे येथे साकारलेल्या ‘आयुर्ब्लीस’ या आयुर्वेद व पंचकर्म केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुक्ता टिळक बोलत होत्या. यावेळी स्थानिक नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, डॉ. गौरी अभ्यंकर-कर्वे, शारंगधर फार्माचे संचालक आणि सनदी लेखापाल मुकुंद अभ्यंकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply