ठळक बातम्या तंत्रज्ञान पुणे होम

PAN कार्डच्या नियमांमध्ये 1 एप्रिलपासून मोठे बदल होणार ……

नवी दिल्ली- आपण पॅन कार्ड बनवण्याचा निर्णय घेतला आहे, तर मग काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण प्राप्तिकर विभागानं पॅन कार्डाच्या नियमांत तीन मोठे बदल केले आहेत. प्राप्तिकर विभागानुसार, पॅन कार्डसाठी अर्ज करत असताना घटस्फोटित आई-वडील असल्यास वडिलांचं नाव देणं आता बंधनकारक असणार नाही. प्राप्तिकर विभागानं एका अधिसूचनेद्वारे प्राप्तिकराच्या नियमांत संशोधन केलं आहे. जाणून […]

जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांची अचानक एक्झीट…. धक्कादायक.. सामाजिक भान असलेला पोलिस वर्दीतला सिंघम काळाच्या पडदयाआड

.पोलिस निरीक्षक गिरीष पाटील यांचे नाशिकच्या अपोलो हॉस्पीटलमध्ये मृत्यूंशी झंुज देत असतांना अखेर निधन झाले. गिरीष पाटील हे आधी शहादा तालुक्यात पोलिस निरीक्षक म्हणून रूजू झाले होते. प्रचंड वाचनाचा व्यासंग असलेल्या या माणसाला माणूस जोडण्याचा छंद होता. माणसं जोडत असतांना अमळनेर तालुक्यातील मारवड या गावाच्या विकासासाठी ते सतत झटत होते. रूबाबदार राजबिंडा या व्यक्तीमत्वाने अनेकांच्या […]

ठळक बातम्या पुणे मनोरंजन होम

शिवांजली डान्स अकॅडमी ची “हरी – हर” नृत्यसंध्या ‘ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

 नृत्यामुळे जीवनाला लय ताल प्राप्त होते :सौ. दीपा श्रीराम लागू..संस्कृती जपणे विद्यार्थ्याचे कर्तव्य : सौ. भारती बर्‍हाटेपुणे : शिवांजली डान्स अकॅडमीचा 10 वा वर्धापनदिन  जेष्ठ अभिनेत्री सौ. दीपा श्रीराम लागू आणि सीड इन्फोटेकच्या संचालिका सौ. भारती  बर्‍हाटे यांच्या उपस्थितीत टिळक स्मारक मंदिर येथे 10 मार्च 2019 रोजी साजरा करण्यात आला. अनुजा बाठे यांच्या नृत्य दिग्दर्शित ” […]

आरोग्य जीवन शैली ठळक बातम्या पुणे होम

गुड टच, बॅड टच’ उपक्रम राज्यभर राबविणार

प्रवीण घुगे; ग्रॅव्हिटस फाउंडेशन व रिफ्लेक्शन कौन्सिलिंग सेंटरतर्फे जागृती कार्यक्रमपुणे : “बाललैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी मुलांना स्पर्शज्ञान असणे महत्वाचे आहे. ग्रॅव्हिटस (युएसके) फाउंडेशनने सुरु केलेला ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. मुलांना चांगल्या-वाईट स्पर्शाचे ज्ञान देऊन होणाऱ्या अन्यायाविरोधात मोकळेपणाने बोलता यावे व त्यांच्यात निर्भयता यावी, याकरिता ‘गुड टच, बॅड टच’ हा उपक्रम राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन […]

ठळक बातम्या पुणे पुणे सांगली होम

आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी- जिल्‍हाधिकारी नवल राम

पुणे, दिनांक 11- निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होणार असून कोणीही आचार संहितेचा भंग करु नये, असे स्‍पष्‍ट निर्देश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात कार्यालय प्रमुखांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्‍यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, उप जिल्‍हा निवडणूक […]

ठळक बातम्या पुणे मनोरंजन होम

सुख म्हणजे नक्की काय असतं’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त …..

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. सुख मिळवण्यासाठी आपण आपला प्रत्येक क्षण वेचत असतो आणि आपापल्या परीने सुखी राहण्याचा मार्ग शोधत असतो. दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी नेहमीच आपल्या कलाकृतीतून जगण्याचे वेगवेगळे पदर उलगडले आहेत. चित्रपटगृहाबाहेर पडणाऱ्या प्रेक्षकाला सुख म्हणजे काय असतं याचं उत्तर देत सत्य घटनेवर प्रेरित अमेरिकेत घडणारी कथा सुख […]

जीवन शैली ठळक बातम्या तंत्रज्ञान पुणे महाराष्ट्र

‘सूर्यदत्ता’ व ‘ईक्लॅट’ आयोजित मोफत ‘जॉबफेअर’मधून तरुणांना क्रूज, पंचतारांकित हॉटेलांत नोकरीची संधी

क्रूज कंपन्या, पंचतारांकित हॉटेलांचा ’सूर्यदत्ता’मध्येहॉटेल मॅनेजमेंटच्या तरुणांसाठी बुधवारी नोकरी मेळावाकार्निव्हल या जगातील सर्वात मोठ्या क्रुजसह अन्य 20 कंपन्या होणार सहभागी; पदविका, पदवी व पदव्यूत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी,तसेच नोकरीत असलेल्या तरुणांसाठीसुर्यदत्ता इन्स्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंट व ‘ईक्लॅट’तर्फे आयोजन पुणे : सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि ईक्लाट हॉस्पिटॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत जॉबफेअरचे आयोजन केले आहे. कार्निव्हल जगातील […]

ठळक बातम्या पुणे होम

कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते देण्याबाबत शासनाचा जीआर

# वेतन व भत्ते,# मूळ वेतन,# विशेष / महागाई भत्ता,# घरभाडे भत्ता,# इतर भत्ते,# पीएफ,# इएसआयएस / कर्मचारी नुकसान भरपाई,#व्यावसायिक कर (P.T.),# बोनस व सुट्टयांच्यादिवशी केलेले काम इ.अनुज्ञेयतेनुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे. मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंत्राटदारांसमवेत केलेल्या करारानुसार आणि विविध कामगार कायद्यानुसार वेतन प्रदान करण्यासंदर्भात समान कार्यपध्दती […]

ठळक बातम्या लाईव्ह अपडेट्स होम

चाकणचे नगरसेवक राहुल कांडगे यांच्या मोटारीची तोडफोड,. सहा जणांवर गुन्हा दाखल,.

चाकण,   दि.   ( वार्ताहर ) –     बेकायदा गर्दी जमाव जमवून चाकण नगरपरिषदेचे नगरसेवक राहुल किसन कांडगे यांच्या इनोव्हा गाडीची तोडफोड करण्यात आल्याची विचित्र घटना गुरुवारी ( दि. ७ मार्च ) रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.  याप्रकरणी चाकण पोलिसांनी शुक्रवारी ( दि. ८ मार्च ) सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.     राष्ट्रवादी कॉंग्रेसचे […]

ठळक बातम्या पाककला होम

लोणी काळभोर येथे बाजारासाठी पत्राशेडचे आ.बाबूराव पाचर्णे यांचे हस्ते उद् घाटन

लोणी काळभोर – प्रतिनिधी – (चंद्रकांत दुंडे.) येथील आठवडे बाजार भरणाऱ्या व्यापारी, शेतकरी व ग्राहकांना ऊन, पाऊस यापासून संरक्षण मिळावे आणि शेतीचा माल खराब होऊ नये यासाठी लोणी काळभोर ग्रामपंचायतिच्या माध्यमातून ग्रामनिधी व नागरी सुविधा निधी मधून शेड बांधण्यासाठी अंदाजे ३०,००,००० लाख रुपये चे कामाचे भूमिपूजन आमदार बाबुराव पाचर्णे याच्या हस्ते करण्यात आले.       कार्यक्रमाचे अध्यक्ष […]