क्रिडा

एकलव्य विज्ञान परिषद 2019 उदघाटन समारंभ बालेवाडी पुणे

Share news

मुलांना संशोधनाची गोडी लागण्यासाठी

शिक्षणाला तंत्रज्ञानासह विज्ञानाची जोड आवश्यक

–    डॉ. सुनील मगर

पुणे दि. 28: देशाची प्रगती युवा पिढीच्या हातात आहे. मुलांना संशोधनाची गोडी लागावी यासाठी त्यांच्या रोजच्या शिक्षणाला तंत्रज्ञानसह विज्ञानाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी आज केले.  समाजाच्या गरजांची पूर्तता करणारे संशोधन व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था व मुव्हींग अकॅडमी ऑफ मेडिसीन ॲन्ड बायोमेडिसीन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एकलव्य विज्ञान परिषद 2019’ मधील एकलव्य सायन्सकॉन प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. सुनील मगर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

Leave a Reply