Acupuncture summit organized on Saturday
आरोग्य ठळक बातम्या पुणे

ऍक्युपंक्चर समिटचे शनिवारी आयोजन

Share news

पुणे, 22 फेब्रुवारी 2019 : स्वास्थ्य संतुलन मेडिकेअर आयोजित झोनल एसीयु समिटचे शनिवारी (दि. २३ फेब्रुवारी) आयोजन केले आहे. ऍक्युपंक्चरला वैद्यकीय मान्यता मिळाल्याबद्दल महाराष्ट्र ऍक्युपंक्चर कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आर. बेहराम यांच्यासह इतर सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव  डॉ. विकास आबनावे, सुमंत घैसास, डॉ. हेमंत ठक्कर, डॉ. सुमिता सातारकर आदी उपस्थित असणार आहेत. शनिवार, दि. २३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता नीतू मांडके सभागृह, इंडियन मेडिकल असोसिएशन, स्वारगेट, पुणे येथे हा सोहळा होणार आहे.

आता बातमी, माहिती, मनोरंजन, दिनविशेष, तंत्रज्ञान, खेळ आणि नोकरी विषयक माहिती तुमच्या व्हाट्सअँप वर अगदी विनामूल्य मिळवा.

https://goo.gl/UFZBzk