ठळक बातम्या पुणे मनोरंजन होम

८ मार्चला धडाकेबाज ‘रॉकी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Share news

अॅक्शनपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज अॅक्शनसीन आणि नायकनायिका यांच्यातील फुलणारं प्रेम आणि या प्रेमवीरांच्या कुटुंबामधील नाट्य अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘रॉकी’ हा मल्टीस्टारर चित्रपट ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती ड्रीम व्हिवर प्रोडक्शन्स आणि सेवेन सीज प्रोडक्शन्स यांनी केली असून प्रस्तुती पेपरडॉल एन्टरटेन्मेंट यांची आहे. 

रॉकी आणि संजना यांच्यात प्रेमाचं नातं फुलत असताना अचानक काही अकल्पित घटनांना या दोघांना सामोर जावं लागतं. नैतिकतेचा बुरखा चढवून काही समाजकंटक या चुकीच्या गोष्टीघडवून आणत असतात. त्यांच्या या कृत्याविरोधातलढा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॉकीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत राहतो. त्याविरोधात लढण्याची धमक रॉकी कशाप्रकारे आणतो याची चित्तथरारक कहाणी रॉकी मध्ये पहायला मिळणार आहे

 ‘रॉकी या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतायेत या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. हिंदीतील अभिनेते राहुल देव ही या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीत काम करणार आहेत.